Boisar Wada Bus Accident News : बोईसर - वाडा बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

Boisar - Wada Bus Accident : वाडा - मनोर मार्गावर बस आणि कंटेनरचा आज (बुधवार) भीषण अपघात झाला. वाड्या जवळील वरले येथे कंटेनर आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. 

आज सकाळी बोईसर - वाडा बस बोईसरहून वाड्याच्या दिशेने येत असताना वाडा तालुक्यातील वरले जवळ बसला अपघात झाला. कंटेनर व बसची समोरासमोर धडक झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.

या अपघातानंतर या परिसरातील वाहतुक काही काळ ठप्प झाली. या अपघातात दोन्ही वाहन चालकांसह बस मधील सुमारे 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply