BMC Covid Scam : बीएमसीचा मृतदेहांच्या बॉडीबॅग खरेदीत घोटाळा? धक्कादायक माहिती आली समोर

BMC Covid Scam : कोविद काळात मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीचं कालपासून छापा सत्र सुरु आहे. आजही ईडीने मुंबई महानारपालिकेच्या खरेदी मध्यवर्ती कार्यालयात दाखल होत अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'इंडिया टुडे'ला ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड काळात मोठा मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाला आहे. सूत्रांनी सांगितलं आहे की, मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाला असून बोगस कर्मचारी दाखवून गैरव्यवहार झाला आहे. याकाळात ज्या बॉडी बॅग्स दोन हजारांना मिळत होत्या. त्याच बॅग चढ्या भावाने म्हणजेच ६ हजार ८०० रुपयांना विकत घेतल्या गेल्या.

घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचं नाव आलं पुढे

या कथित घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचं नाव देखील आता पुढे आलं आहे. यावर मात्र अद्याप त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply