BMC Budget 2023-24 Update : मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सुरू, महापालिकेचं बजेट 52619 कोटी;मुंबईकरांच्या अपेक्षा होणार का पूर्ण?

BMC Budget 2023-24: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा 50 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, कचरा आणि कर हे घटक केंद्रस्थानी असणार आहेत. गेल्या वर्षी हा अर्थसंकल्प 45 हजार कोटींचा होता. 

यंदा स्थायी समिति अध्यक्षांऐवजी अतिरिक्त आयुक्त महापालिका आयुक्त हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढच्या काही महिन्यात पालिका निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
मार्च 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेवरील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या हाती मुंबई महानगरपालिकेचा कारभार आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असलेल्या विषयांसह कोस्टल रोड, शहारांमध्ये वाढत चाललेली गर्दी लक्षात घेता नवीन उड्डाणपुल, आरोदग्य, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शिक्षण यावर आज भाष्य केलं जाणार आहे.
 
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 2030 पर्यंतच्या शून्य कचरा अभियानासाठी देखील तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये घाणीचे साम्राज्य कमी करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी पावसाळ्यात नवीन ड्रेनेज लाईन, नद्या, नाले यांचे निर्जंतुकीकरण, डबक्यांमध्ये पाणी साचूनये यासाठी उपाययोजना यासाठी आर्थिक तरतूदीची गरज आहे. त्यामुळे कोणत्या घटकांना पालिका किती आर्थिक तरतूद करते हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply