BMC Budget 2023 : मुंबईत सुद्धा येणार शाळांचा दिल्ली पॅटर्न? आधुनिक शिक्षणावर भरीव तरतूद

मुंबई महानगरपालिकेकडून आज जवळपास ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाने ५० हजार कोटींचा आकडा पार केला आहे. यावर्षी शिक्षण विभागासाठी ३ हजार ३४७.१३ कोटी तुटीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये आधुनिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. डिजिटल क्लासरुम, ई-वाचनालय या सगळ्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. व्हर्च्युअल क्लासरुमसाठी ३.२० कोटी, ई- वाचनालयासाठी १० लाख तर डिजिटल क्लासरुमसाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांसाठी ६० लाखांची तर ऑलिम्पियाड परिक्षांसाठी ३८ लाखांची तरतूद कऱण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधल्या प्रशिक्षण आणि उपक्रमांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली असन रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मुलांची मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण २८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळांसाठी १०.३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्थसंकल्पात २८.४५ कोटी तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply