BJP Leader : आधी मांडीवर बसवंल अन् डान्सरला किस; ७० वर्षीय भाजप नेत्याने भर लग्नात डान्सरसोबत नेमकं काय केलं?

BJP Leader :  उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बब्बन सिंग रघुवंशी यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या मांडीवर एक डान्सर बसली आहे. तसेच तिच्यासोबत ते आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच रघुवंशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, हा व्हिडिओ म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

व्हायरल व्हिडिओ हा बिहारमधील एका लग्नाच्या मिरवणुकीतील असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओबद्दल रघुवंशी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 'बिहारमधील लग्नाच्या मिरवणुकीत मी उपस्थित होतो. स्टेजवरील डान्सर स्वतःहून माझ्याजवळ आली आणि काही वेळ बसली. मी तिला कोणताही आग्रह केलेला नाही. व्हिडिओ एडिट करून बनवण्यात आला आहे. आजच्या युगात काहीही शक्य आहे.' असं ते म्हणाले.

India-Pakistan Clash : भारत-पाकिस्तान तणाव क्रिकेटच्या मैदानावर, BCCI चा PCB ला दणका, आशिया चषकात खेळण्यास नकार

'मी पक्षाचा जुना आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझे वय ७० वर्षे आहे. माझं नाव खराब करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. परिवहन मंत्री दया शंकर सिंह हे माझे नातेवाईक आहेत, आणि त्यामुळेच विरोधकांच्या निशाण्यावर मी आहे. व्हिडिओ व्हायरल करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी व्हायरल व्हिडिओवर दिली.

पोलीस कारवाईची मागणी

रघुवंशी या व्हिडिओ संदर्भात पोलिसांची मदत घेणार आहेत. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. रघुवंशी यांनी ही व्हिडिओ एडिडेट असून, या व्हिडिओमागे कुणाचा हात आहे, हे शोधून काढणार असल्याचं सांगितलं. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर बब्बन सिंग यांच्याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply