BJP Donation: लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आलेय. त्यासोबतच भाजपसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे, २०२३-२४ या वर्षात भाजपला सर्वाधिक देणगी मिळाली आहे. गतवर्षी पेक्षा तीनपट अधीक देणगी भाजपला मिळाल्याचे आकड्यातून समोर आलेय. या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर (BJP and Congress electoral bond contributions 2023-24) आहे. गतवरि्षीपेक्षा काँग्रेसला तीनपट जास्त देणग्या मिळाल्या आहेत. पण भाजपापेक्षा खपूच कमी आहे.
२०२३-२४ या वर्षांमध्ये भाजपला एखादी व्यक्ती, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून २०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. भाजपल मिळालेल्या देणगीची एकूण रक्कम २,२४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत तीनपट जास्त आहे. दुसरीकडे या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला २०२३-२४ मध्ये २८८.९ कोटी रुपयांची देणगी मिळाली. गतवर्षी काँग्रेसला ७९.९ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.
२०२३-२४ मध्ये राजकीय पक्षांना मिळेलेल्या देणगीची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून (Prudent Electoral Trust) भाजपला ७२३.६ कोटी रुपयांची देणगी मिळाली तर काँग्रेसला १५६.४ कोटी रुपयांची देणगी मिळाली. काँग्रेस आणि भाजपला देणगी देणाऱ्यांमध्ये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट आघाडीवर आहे. मेघा एन्जिनिअरिंग & इन्फ्रा लिमिटेड, सिअरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल हे २०२३-२३ मध्ये देणगी देण्यामध्ये आघाडीवर होते.
निवडणूक रोखेमधून मिळालेल्या देणग्या भाजप आणि काँग्रेसच्या देणगीच्या आकड्यांत समाविष्ट नहीत. कारण, नियमांनुसार राजकीय पक्षांनी हे तपशील फक्त त्यांच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालांत जाहीर करायचे असतात. फेब्रुवारी २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखेची पद्धत रद्द केली. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी निधी मिळवण्याचे प्रमुख स्रोत हे निवडणूक ट्रस्ट मार्गाने किंवा थेट मिळालेल्या देणग्या झालेय.
२०२३-२४ मध्ये इलॉक्ट्रोल बाँडमधून मिळालेल्या देणग्या काही प्रादेशिक पक्षांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये बीआरएसचा समावेश आहे. बीआरएसला ४९५.५ कोटी रुपये इलॉक्ट्रोल बाँडमधून मिळाले आहेत. DMK ला ६० कोटी रुपये आणि YSR काँग्रेसला १२१.५ कोटी रुपये मिळाले आहेत. JMM ने ११.५ कोटी रुपये मिळाल्याचे जाहीर केलेय. पण त्याच्या इतर देणग्या फक्त ६४ लाख रुपयांच्या वर होत्या.
२०२३-२४ मध्ये भाजपच्या देणग्यामध्ये २१२ टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी भाजपने ७४२ कोटी रुपयांची देणग्या जाहीर केली होती, तर काँग्रेसने १४६.८ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले होते. २०२३-२४ मध्ये भाजपला निवडणूक ट्रस्टच्या माध्यमातून ८५० कोटी रुपये मिळाले, ज्यामध्ये ७२३ कोटी रुपये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून आले आहेत. तर १२७ कोटी रुपये ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून आणि १७.२ लाख रुपये Einzigarting इलेक्टोरल ट्रस्टकडून आले आहेत. काँग्रेसला ट्रस्ट मार्गाने १५६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे, त्यामध्ये प्रुडंटच एकमेव देणगी देणारा आहे. प्रुडंटने २०२३-२४ मध्ये BRS आणि YSR काँग्रेसला अनुक्रमे ८५ कोटी रुपये आणि ६२.५ कोटी रुपये देणगी दिली आहे. आंध्र प्रदेशात सध्या सत्ताधारी असलेल्या TDP ला प्रुडंटकडून ३३ कोटी रुपये देण्यात आलेत.
शहर
- Palghar Politics : शिवसेनेचा राज ठाकरेंना धक्का; जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या गटात प्रवेश
- Mumbai Crime : मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर
- Pune : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
महाराष्ट्र
- Thakurdev Yatra : आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा; छत्तीसगडमधून भाविक दाखल
- Accident : देव दर्शनावरून येताना काळाचा घाला, अंकलेश्वरमध्ये विचित्र अपघात, कारचा चक्काचूर, पालघरमधील ३ जणांचा मृत्यू
- Buldhana Crime : बुलडाणा हादरले! वसतीगृह अधीक्षकाचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, आईला सांगितल्याने जबर मारहाण
- Tiger Death : पट्टेरी वाघ आढळला मृतावस्थेत; १३ नखे, २ दात गायब, उकणी कोळसा खाण परिसरातील घटना
गुन्हा
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
- Fraud Case : बोगस टीसी असलेल्या महिलेकडून फसवणूक; रेल्वेत नोकरीचे आमिष देत १७ लाखात गंडविले
- Pune Crime : शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पुण्यातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
- Pune : रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार; मोटारीतून आलेल्या आरोपींकडून दगडफेक; रखवालदाराची पत्नी जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- HMPV Virus : कुंभमेळ्यावर HMPVचं संकट; चिनी लोकांना थांबवा, साधुंकडून पंतप्रधान मोदींना पत्र
- Earthquake : मोठी बातमी! दिल्ली, बिहार अन् बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; 7.1 रिश्टर स्केल तीव्रता
- Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडला जाणार, नवा एक्स्प्रेसवे तयार, 'या' महिन्यापासून करता येणार प्रवास
- HMPV First Case in India : मोठी बातमी! चीनमधील विषाणू भारतात दाखल? HMPV चा पहिला रूग्ण बंगळुरूत आढळला