
Bihar News : बिहारच्या पाटणामधुन एक मोठी बातमी समोर आलेली आहे. घराला भीषण आग लागली. या आगीतून भावंडांना वाचवताना सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिहारमधील बेगुसराय येथील मणिप्पा गावात घडली आहे. मंगळवारी रात्री (२८ मे) लागलेल्या आगीतून सहा वर्षीय सृष्टी कुमारीने आपल्या भावंडांना वाचवलं मात्र या आगीत तिचा मृत्यू झालाय.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, बिहारमधील (Bihar News) बेगुसराय येथील मणिप्पा गावात सृष्टी कुमारीचं कुटुंब राहत होतं. २८ मे रोजी आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात सृष्टी आणि तिची भावंडे होते. रात्री त्यांच्या घराला आग लागली. यावेळी सृष्टी आणि तिचे भावंडे झोपेत होती, पण आगीमुळे सृष्टीला जाग आली. तिने बचावाच्या हेतुने आपल्या भावंडाना उठवलं आणि आगीतुन बाहेर काढण्यात यश मिळवलं.
|
All Eyes On Rafah : सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 'All Eyes On Rafah' नक्की आहे तरी काय? |
आगीची चाहूल लागताच सृष्टी अन् तिची सात वर्षांची बहिण आधी उठली होती. त्यानंतर सृष्टीने तिची १२ वर्षांची बहिण आणि भाऊ प्रियांशु आणि राजबाबू यांना उठवलं. ते घराबाहेर पळाले. पण पळताना सृष्टीचा पाय दाराजवळ असलेल्या सायकलच्या चाकात अडकला. ग्रामस्थांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळालं नाही. या भीषण आगीत (Fire News) त्यांच्या दोन शेळ्या आणि इतर सामानासह संपूर्ण घर जळून खाक (Massive Fire) झालंय. सृष्टीने तिच्या भावांना वाचवलं मात्र तिचा मृत्यू झालाय.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, प्रकाशासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेलच्या दिव्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात (Girl Dies After Saving Sibling From Fire) आहे. सृष्टीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कुटुंबाला कबीर अंत्येष्टी योजनतर्गत तीन लाख रुपये आणि कुटुंब लाभ योजनेंतर्गत वीस हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत मिळाल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

