Bhiwandi News : अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकावर फेरीवाले- दुकानदारांचा हल्ला; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

Bhiwandi News : अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पालिका पथकावर दुकानदार फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमधून समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळत आहे. प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत येत असलेला बाग ए फिर्दोस ते बाला कंपाऊंड या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम काल प्रभाग अधिकारी सुदाम जाधव यांनी हाती घेतली.

Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणी मोठी घडामोड: ससूनमधील क्लार्क अन् नर्सेसची चौकशी सुरू; मोठ्या कारवाईची शक्यता

रस्त्या लगतच्या फूटपाथवरील दुकानांचेअतिक्रमण तसेच रस्त्यावरील हातगाड्या हटवण्यासाठी सुदाम जाधव हे अतिक्रमण पथक व पोलिसांसह या ठिकाणी आले होते. यावेळी काही संतप्त दुकानदार व फेरीवाल्यांनी पालिका पथकावर दगडफेक करीत हल्ला चढवला. परंतु त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगवला.

यावेळी फेरीवाले व दुकानांपुढील अतिक्रमणावर जोरदार कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी शहरातील कामतघर ताडाळी ता रस्त्यावर सुध्दा अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथका वर फेरीवाले दुकानदार यांनी हल्ला केला होता. त्यामुळे शहरातील फेरीवाले दुकानदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे आव्हान पालिका प्रशासना समोर उभे ठाकले आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply