Bhiwandi News: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

Bhiwandi News: भिवंडी तालुक्यात आज मोठी दुर्घटना घडली आहे. वळ ग्रामपंचायत हद्दीत वळपाडा येथे इमारत कोसळली. या दुर्घटनेत तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. 

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे आज, दुपारी ही इमारत कोसळली. भिवंडीतील वर्धमान इमारत नावाची कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले होते. या दुर्घटनेत सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन मृतदेह बाहेर काढले. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं बचावकार्य सुरू आहे.

भिवंडीतील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये तीन चिमुरड्या बालकांचा समावेश आहे. ही इमारतीचं बांधकाम २०११ साली करण्यात आले होते.

N.D.R.F व T.D.R.F. जवान घटनास्थळी असून श्वानपथक देखील मागवण्यात आले आहे. इमारीतीखाली आणखी काही नागरिक अडकले असून त्यांना काढण्याचे प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकराने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत जाहीर केले की, भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत'.

'जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply