Bhiwandi Fire News : भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; अनेक वाहने जळून खाक, परिसरात धुराचे लोट

Bhiwandi Fire News : भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी (ता. १९) रात्री १ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण गोदामाला विळखा घातला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत एक कंटेनर, एक छोटा टेम्पो आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय गोदामातील भंगार जळाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 

IPL 2024 : रोहित-पांड्याच्या वादावर सर्वांचं लक्ष; मात्र 'या' स्टार खेळाडूने दिलं नीता अंबानीना टेन्शन

भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यावरील वळ ग्रामपंचायत हद्दीत एक भंगाराचे गोदाम आहे. मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण गोदामाला विळखा घातला.

आग इतकी भीषण होती, परिसरात धुराचे लोट दिसून येत होते. दरम्यान, या आगीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना विळखा घातला. यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या काळात नारपोली पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक थांवून ठेवली होती. गोदामात साठवून ठेवलेलं ज्वालाग्राही साहित्य हे आगीचे कारण बनत असल्याचे समोर आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply