Bhiwandi Crime News : व्याजासह पैसे परत दिले तरीही छळ, व्हिडिओ तयार करून संपवलं आयुष्य, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Bhiwandi Crime News : व्याजासह पैसे दिले तरीही आरोपी आणखीन पैसे उकळत असल्यामुळे एकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अमिन शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अमीन शेख यानं तीन जणांकडून १ लाख ८० हजार रूपये घेतले होते. त्यानं ३ लाख ३० हजार रूपये व्याजासह परत केले. मात्र, जास्त पैसे उकळण्यासाठी त्याला त्रास देण्यात येत होता. त्यामुळे अमिन शेख याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील महापोली येथे घडली आहे.

अमिन शेख याने ३ जणांकडून १ लाख हजार रूपये घेतले होते. व्याजासकट त्याने ३ लाख ३० रूपये परत केले. मात्र, तरीही ३ जणांकडून जास्त व्याजासाठी तगादा लावण्यात येत होता. आणखीन पैसे उकळण्यासाठी ३ जण अमिन यांना त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून अमिन याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Union Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प समजून घ्या महाराष्ट्राचे CM फडणवीस आणि DCM शिंदे यांच्या नजरेतून;

वाचा काय म्हणाले...

विष प्राशन करण्यापूर्वी अमिन यानं व्हिडिओ तयार केला. नंतर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला आणि विष प्राशन करून आत्महत्या केली. व्हिडिओच्या आधारे अमिनच्या भावाने गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, १ महिन्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली असून, २ जण अद्याप फरार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply