Bhiwandi crime : भिवंडीत कामगारांच्या दोन गटात हाणामारी; एकावर धारधार शस्त्राने वार

Bhiwandi : भिवंडीत लूम कामगारांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एकाला जबर मारहाण करीत चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

भिवंडी शहरातील भोईवाडा पोलिस ठाण्यात हद्दीत रुममध्ये एकाच ठिकाणी काम करणाऱ्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून आपआपसात वाद झाले होते. एकाच ठिकाणी लूम काम करणाऱ्या मित्रांमध्ये वाद झालेला हा वाद येवढा विकोपाला गेला कि भर रस्त्यावर येत त्यांची हाणामारी झाली. याच हाणामारीत एकाने मित्रावर चाकूने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील नागरिक मात्र हा संपूर्ण प्रकार पाहत होते.

Pune Accident : भोरमध्ये भीषण अपघात, २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, २ जणांचा जागीच मृत्यू

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एकाने धारधार चाकूने हल्ला करत चाकूचे सपासप वार केल्याने एक जण यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला लागलीच उपचारासाठी ठाणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हाणामारीचा सर्व प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात आपापसातील वादातून झालेल्या झटापटीत मित्रावरच चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ला करून हल्लेखोर तिथेच उभा राहिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मात्र फक्त बघायची भूमिका घेतली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. चाकूने वार करणाऱ्या एकाला पोलिसांनी घटनास्थस्ळावरून ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply