Bharat Jodo: राहुल गांधींच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; होणार जोरदार शक्तीप्रदर्शन

Bharat Jodo:  काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी  मुंबईत दाखल होत असून या यात्रेच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष या यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले आहेत.

‘सबको समान अवसर मिलने तक, न्याय का अवसर मिलने तक’, अशा आशयाचे पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग काँग्रेसने रस्त्यांवर ठिकठिकाणी लावले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता उद्या संध्याकाळी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल होत आहे.

Pune News : पुणे शहरात अग्नितांडव; वाघोलीत गोदामाला भीषण आग, येरवड्यात लाकडी साहित्याचं गोदाम जळून खाक

शनिवारी दुपारी १ वाजता यात्रा भांडूप सोनापूर येथे दाखल होणार असून तेथे राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहेत. सोनापूर सिग्नलपासून ही यात्रा पुढे धारावी मार्गे माटुंगा पश्चिम येथे संध्याकाळी ४ वाजता येईल. माटुंगा येथील झेड ब्रिजजवळ सामाजिक नेते तुषार गांधी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या यात्रेचे स्वागत होणार आहे.

संध्याकाळी ५ वाजता ही न्याय यात्रा चैत्यभूमीवर पोहोचणार असून राहल गांधी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजी पार्कवर जाहिर सभा होणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *