Bhandara News : बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; अंत्ययात्रा स्मशानात, भरल्या डोळ्यांनी लेकीने दिली परीक्षा, गावकऱ्यांची हळहळ

Bhandara : मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मुलीचा बारावीचा पहिला पेपर होता. वडिलांना अखेरचा निरोप देत मुलीने परीक्षा दिली. या हृदयद्रावक घटनेने आंबागड गावात शोककळा पसरली आहे.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी हौशीलाल रहांगडाले (वय ४८) हे मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांचा ९ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता दरम्यान मृत्यू झाला.

मुलगी जान्हवी ही बारावीत असून तिची मंगळवारी बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता हौशीलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. दु:खावर मात करत मनामध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता जान्हवीने वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. तर जान्हवी ही तुमसर येथील जनता शाळेतील परीक्षा केंद्रावर पेपर द्यायला निघाली. या दोन घटनांमुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Bhandara News : बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी वडिलांचा मृत्यू; अंत्ययात्रा स्मशानात, भरल्या डोळ्यांनी लेकीने दिली परीक्षा, गावकऱ्यांची हळहळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *