Bhandara Crime News : वादातून शस्त्राने वार करत युवकाची हत्या; भंडारा शहरातील गजबजलेल्या परिसरातील घटना

Bhandara Crime News : दोघांमध्ये असलेल्या आपसी वाद विकोपाला पोहचला. या वादातून एकाने धारदार शस्त्राने वर करून तरुणाची  हत्या केली. सदर घटना भंडारा शहरातील गजबजलेल्या डी मार्टच्या मागील परीसरात घडली. यामुळे  भंडारा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.  

कपिल उजवणे (वय २९, रा. भगतसिंग वार्ड टाकळी) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. कपिल व अन्य एका तरुणासोबत  वाद होता. दोघांमधील हा वाद टोकाला पोहोचला. याच आपसी वादातून दोन युवकात झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने वार करीत युवकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. युवकाचा मृतदेह डी मार्ट येथील मागच्या बाजूच्या परिसरात आढळून आला आहे. 

Vasant More Resignation : आधी राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत, नंतर फेसबुक पोस्ट; वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडण्याचं कारण

घटनेनंतर आरोपी फरार 

घटनेची माहिती भंडारा  पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविला आहे. तर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून भंडारा पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply