Beed News : गाढ झोपेत असतानाच सापाने दंश केला,बहिण-भावाचा जागेवरच मृत्यू; बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Beed News : बीडमध्ये (Beed News) काळीज पिळवटवून टाकणारी घटना घडली आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील कोयाळ गावात सर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दूर्दैवी आहे. यामुळे आजाबूजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धारुरमधील कोयाळ गावात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 24 मे रोजी मध्यरात्री 12 ते 01 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली आहे. घरातच या दोघांचा मृत्यू झाला आहे.

प्रदीप मुंडे यांची 07 वर्षांची मुलगी कोमल आणि 05 वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले. आपल्या दोन्ही मुलांचा जीव गेल्याने आईवडिलांनी आक्रोश केला आहे.

Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट

या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एका घरातील २ निष्पाप जीवांचा गेलेला बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रात्री ही दोन्ही मुले झोपेत होती. अचानक घरात साप शिरला आणि त्यांच्या अंगावर बसला. त्यानंतर त्याने या दोन्ही मुलांना दंश केला. हा साप विषारी असल्यामुळे रुग्णालयात नेताच त्यांचा मृत्यू झाला. ७ वर्षाची मुलगी अन् ५ वर्षांचा मुलगा गेल्याने आईवडिलांना खूप दुःख झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply