Beed News : वाळू प्रकरणी तलाठ्यासह मंडळाधिकारी निलंबित; गोदापट्ट्यातून सुरु होता वाळूचा उपसा

Beed News : नदीतील वाळू उपसा करण्यास बंदी आहे. मात्र अवैधपणे वाळू चोरी सुरूच आहे. दरम्यान अवैध वाळू उत्खनाला जबाबदार ठरलेल्या एका तलाठ्यासह मंडळ अधिकाऱ्याला बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दणका देत निलंबनाची कारवाई केली आहे. 

गौण खनिजाचे उत्खनन करण्यास सक्त मनाई आहे. मात्र माफियांकडून याची चोरून लपून उत्खनन सुरूच आहे. प्रामुख्याने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून नदीतून वाळूची अवैधपणे वाहतूक केली जात आहे. प्रशासनाकडून कारवाई झाल्यानंतर त्या काळापुरतीच वाळू वाहतूक बंद राहते. मात्र नंतर सर्रासपणे हि वाहतूक केली जात असल्याचे समोर येत असते. त्यानुसार मंडळानुसार अधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन वाळू वाहतूक रोखण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र वाळूचे उत्खनन सुरूच असल्याने त्यास जबाबदार धरून दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
 
बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील तलाठी किरण दांडगे यांच्यासह धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे अशी निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ज्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या हद्दीत असणाऱ्या गोदापट्ट्यातून वाळूचा उपसा झाला. दरम्यान या कारवाईने वाळू माफियांना सहकार्य करत पाठबळ देणाऱ्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply