Beed News : ओबीसी बांधवांचे रास्ता राेकाे आंदाेलन, महिलांसह 25 आंदाेलकांवर गुन्हा दाखल

Beed News : प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ओबीसी बांधवांनी गेल्या दाेन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदाेलन छेडले. या आंदाेलनाला तालुक्यांतील गावा गावांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान बीड- अहमदनगर- कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने अमळनेर पोलिसांनी 25 आंदाेलकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे.
 
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी आंदाेलन छेडले आहे. या आंदाेलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी बीड येथील विविध तालुक्यात ओबीसी समाज आंदाेलन करीत आहे. आज हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथून ट्रॅक्टर रॅली वडीगोद्रीकडे रवाना झाली. या रॅली मध्ये शेकडो ओबीसी बांधव सहभागी झालेत.
 
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, या मागणीसाठी अहमदपूर- अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर पिंपळगाव घोळवे येथे ओबीसी बांधवांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला.
 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *