Beed News : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे पडलं महागात; बीड पोलिसांची दीड महिन्यात १९१ जणांवर कारवाई

Beed News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर होती. यात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष होते. अशाच वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या १९१ जणांवर मागील दीड महिन्यात पोलिसांनी कारवाई केली आहे. तर याच प्रकरणात जिल्ह्यात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बीड  जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लागल्यापासून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत होत्या. यावर बीड पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून बीड पोलिसांनी ही कारवाईची मोहीम उघडली असून आतापर्यंत तब्बल १९१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ज्याने सोशल मीडियावर आक्षेपहार्य पोस्ट केल्या आहेत, ज्यामधून जातीय, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात; अशा १९१ जणांना नोटीस बजावून पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

Dhule Crime : धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात

२६३ पोस्ट केल्या डिलीट 
दरम्यान आतापर्यंत ३१६ पोस्ट या बीड पोलिसांना आक्षेपहार्य वाटल्या आहेत. त्या तपासून त्याचे डिटेल्स काढले. त्यापैकी २६३ पोस्ट या सोशल मीडियामधून डिलीट केल्या आहेत. बाकी जवळपास ५० पोस्ट डिलीट करण्याची प्रोसेस सुरू आहे. यातीलच ज्यांनी पोस्ट केल्या, लाईक केले आहे, शेअर केले आहे, त्यापैकी 191 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर आतापर्यंत १६ गुन्हे देखील दाखल झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली आहे

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply