Beed News : अजित पवार गटाला धक्का; बजरंग सोनवणे यांचा सदस्यत्वाचा राजीनामा, सोशल मीडियावर केला पोस्ट

Beed News : महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे. त्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. 

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली होती. याशिवाय जिल्हा परिषदचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. यासह कारखानदारीमध्ये देखील त्यांचे नाव आहे. यामुळे त्यांचे नाव विविध क्षेत्रात देखील घेतलं जाते. दरम्यान बजरंग सोनवणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिलेल्या बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Mumbai News : घाटकोपरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता 

गेल्या अनेक दिवसांपासून बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार  गटाचे म्हणजेच मविआचेउमेदवार असू शकतात? असा तर्कवितर्क लावला जात होता. दरम्यान आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून आज ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply