Beed News : सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या; बीडमधील खळबळजनक घटना

Beed News :  बीडमध्ये एका सहाय्याक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केली आहे. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. सुभाष दुधाळ असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. दरम्यान ही घटना मध्यरात्री केव्हा घडली आणि दुधाळ यांनी आत्महत्या का केली? हे समजू शकले नाही. मात्र या धक्कादायक घटनेने परळी शहरात खळबळ उडाली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे; मनसैनिकांना दिल्या महत्त्वाचे सूचना

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मयत पोलीस अधिकाऱ्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply