Beed News : महामार्ग दुरुस्तीसाठी अडविला रस्ता; आमदार सोळंकेचाही सहभाग

Beed News : खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीच्या प्रश्नाकडे  सरकारचे लक्ष वेधण्याकरिता माजलगावकरांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात स्वतः आमदार प्रकाश सोळंके देखील सहभागी झाले होते.

बीडच्या माजलगाव तालुक्यातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था झालेली आहे. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आज स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी रास्ता रोको करून स्थानिकांनी लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खामगाव पंढरपूर  या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था होऊन भेगा पडल्या आहे. यामुळे महामार्गावर अपघात होऊन ४१ जणांनी आपले जीवन गमावले आहे. 

Accident News : दोन भरधाव दुचाकींची जोरदार धडक; थरारक अपघातात २ जागीच ठार, २ जखमी

८ दिवसांची दिली मुदत 

वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील सदरील प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे आज प्रकाश सोळंके यांच्यासह स्थानिकांनी रास्ता रोको केला. येत्या ८ दिवसांमध्ये रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तर मात्र पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply