Beed Crime : वाळू माफियांकडून पथकावर हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा; मंडळ अधिकारीसह चार कर्मचारी निलंबित

Beed : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असते. या कारवाई दरम्यान वाळू माफियांकडून अनेकदा पथकांवर हल्ला करण्यात येत असतो. यानुसारच बीडमध्ये गोदावरी नदीत वाळू उत्खनन सुरु असताना वाळू माफियांकडून महसूल पथकावर हल्ला करण्यात आल्याचा बनाव करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी करत जिल्हाधिकारी यांनी मंडळ अधिकाऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील वाळू घाटाची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ५ जानेवारीला स्वतः पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या वाळू उत्खनन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. वाळूच्या उत्खननावर लक्ष ठेवणे ही मंडळ अधिकारी, तलाठी यांची प्राथमिक जबाबदारी असताना त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यास अक्षम्य दिरंगाई केली. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

HMPV Virus : कुंभमेळ्यावर HMPVचं संकट; चिनी लोकांना थांबवा, साधुंकडून पंतप्रधान मोदींना पत्र

चार कर्मचारी सेवेतून निलंबित

दरम्यान वाळू माफियांकडून याच महसूलच्या पथकावर हल्ला केल्याचा खोटा गुन्हा महसूल कर्मचाऱ्यांनी दाखल केला होता. या प्रकरणी चौकशी केली असता चौकशीत हा गुन्हा खोटा असल्याचं सिद्ध झाले. या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात मलीन झाली आहे. अधिकाऱ्यांच्या गैर वर्तनाचे गांभीर्य विचारात घेवून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या ४ कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

विभागीय चौकशी होणार

जिल्हाधिकारी पाठक यांनी गेवराई तालुक्यातील रेवकीचे मंडळ अधिकारी पकाले बाळासाहेब हरिदास, रेवकी सज्जाचे तलाठी गोविंद प्रभाकर नरवटे, आगरनांदूरचे तलाठी गणेश तुळशीराम बावसकर आणि गेवराई तहसील कार्यालयातील शिपाई विठ्ठल रामराव सुतार असे तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश काढले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply