Beed Accident : बीड अहमदनगर मार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोने कारला उडवलं, ४ जणांचा जागीच मृत्यू

Beed Ahmednagar Highway Accident : बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीड-अहमदनगर महामार्गावरील जाटनांदूर परिसरात स्कॉर्पिओ आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, , बीडहून  अहमदनगरकडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराईकडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला.

Chhatrapati Sambhajinagar Accident : प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसचा टायर फुटल्याने अपघात; 12 जण जखमी

हा अपघात एवढा गंभीर होता की, यामध्ये ४ जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील मारफळा या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस घटनास्थळी रवाना झाले.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. अपघातात एकाचवेळी ४ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply