Beed Accident : धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर कार - दुचाकीचा भीषण अपघात, वकीलासह तिघे जखमी

Beed : धुळे - सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या चौसाळा बायपास जवळ कार- दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

या अपघाताबाबत पाेलीसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - मंगळवारी रात्रीच्या सुमारास धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या चौसाळा गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघे वीस फूटांवर जाऊन पडले. यामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. तसेच कारचालक देखील जखमी झाला. या अपघातात कारचे माेठे नुकसान झाले आहे.

या अपघातामध्ये अमोल बोडके (वय 30 राहणार बनगरवाडी ता. वाशी, जिल्हा धाराशिव) तसेच ऍड. अजित भैरट (वय 42 राहणार इजोरा ता. वाशी) अशी गंभीर झालेल्या जखमींची नावे आहेत. दरम्यान तिन्ही जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती पाेलीसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply