
Beed : संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने उलटले, पण अद्याप एक आरोपी फरार आहे, त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलाय. या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायाने मोठा निर्णय घेतला आहे. अन्नत्याग आंदोलनात वारकरी सहभागी होणार आहेत. आज मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले.
भागचंद महाराज झांजे यांनी मसाजोग येथे येऊन देशमुख कुटुंब यांची भेट घेतली. त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाला पाठिंबा दिला. मस्साजोगमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सोबत राहू असे देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी सांगितलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आणि उर्वरित मागण्यासाठी मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याच अनुषंगाने आज वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, या अगोदर भागचंद महाराज हांडे यांना भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या बद्दल बोलल्यामुळे आणि प्रतिक्रिया दिल्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांच्या समर्थकांकडून धमक्याचे फोन आले होते. त्या संदर्भात भागचंद झांजे महाराज यांनी पोलीस अधीक्षकांना महंत नामदेव शास्त्री महाराज आणि समर्थकान विरोधात तक्रार दाखल केली होती.
अन्नत्याग आंदोलनाच्या अगोदर मस्साजोगच्या गावकऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची आज दुपारी भेट घेणार आहेत. बीडच्या पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी बालाजी तांदळीची गाडी वापरली, मग आरोपींना शोधण्यासाठी बालाजी तांदळीची गाडी का वापरली? बालाजी तांदळे आरोपींना फराळ होण्यासाठी मदत करत होता का? या संदर्भात पोलीस अधीक्षकांना विचारणा करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

