Sand Mafia : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; ४० डंपर मालकांना १५० कोटींचा दंड, जिल्हाधिकारींकडून नोटीस

Beed : बंदी असताना देखील अवैधपणे वाळूची वाहतूक सुरूच आहे. अशा वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. यानुसार अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डम्पर चालकांना बीड जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसीबाबत देण्यात आलेला खुलासा अमान्य करत जिल्हाधिकारी यांनी कारवाई करत १५० कोटी रुपयांचा दंड केला आहे. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आता महसूल प्रशासनाने ही कठोर पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्यावर महसूल विभागाची नजर असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशातच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४० डंपर मालकांना तब्बल १५० कोटी रुपये दंड बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची हि मोठी दंडात्मक कारवाई आहे.

सुरवातीला दिल्या नोटीस

जिल्ह्यात डंपरद्वारे सर्रासपणे वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. अर्थात काही केल्या हि वाळू वाहतूक थांबत नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाची यावर लक्ष ठेवले होते. यात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून ३ हजार ३०० नोटीस महसूल प्रशासनाने पाठवल्या होत्या. याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. मात्र त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

दंड भरण्यास सात दिवसांची मुदत

जेवढ्या फेऱ्या तेवढ्या नोटीस असा पॅटर्न यामध्ये राबवला होता. या ४० डंपरच्या तीन हजार तीनशे फेऱ्या झाल्याने तेवढ्याच नोटीस पाठवल्या होत्या. दरम्यान डंपर मालकांनी नोटिसीबाबत दिलेला खुलासा मान्य करत प्रत्येक फेरीस ४ लाख ५७ हजार रुपये दंडाप्रमाणे १५० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम सात दिवसात भरण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान या निर्णयाविरुद्ध हे डंपर चालक- मालक ६० दिवसात आयुक्तांकडे देखील दाद मागू शकणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply