Beed News : आई जगात नाही, वडील व्यसनाधीन, गतिमंद मुलीला बापानेच गोठ्यात डांबलं; बीडमधल्या 'त्या' मुलीची अखेर सुटका

Beed : बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली. सध्या या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहेत. मुलगी गतिमंद असल्यानं तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलं होतं. गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या. तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेनं या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही परिस्थिती पाहिली.

त्यांना या मुलीची दया आल्यानं त्यांनी तिची सुटका केली. तेथून तिला छत्रपती संभाजीनगर येथील अनाथालयात दाखल केलं असून त्या ठिकाणी आता तिचे समुपदेशन देखील करण्यात आलं. संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्याने हे सर्व कारवाही करण्यात आली. महिलेची जागरूकता आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे या मुलीची सुटका होऊ शकली.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधू 'उडन छूsssss'

दरम्यान, जिल्ह्यात अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वीच लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरमधून प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ९ मे रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेकजण हजर होते. विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. पण, यावेळी वधूच्या मनात काही औरच होतं.

९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नवदाम्पत्यांनी जोडीने देवदर्शन केलं. त्या नंतर ११ मे रोजी नवरीला मुरळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आलं. मात्र त्यानंतर तिने रात्री शौचाला जाण्याच्या बहाण्याने भावजाईचा मोबाईल घेतला आणि त्याद्वारे आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराशी संपर्क साधला. त्यानंतर ती घरी येऊन झोपी गेली, आणि इतर नातेवाईक अंगणात झोपी गेले. त्यानंतर १२ मे रोजी तिच्या आईला घरातील लाईट बंद असल्याचं आढळून आल्यानं तिने घरात जाऊन पाहिलं असता ती आढळून आली नाही.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply