Barsu Refinery Survey : बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटणार? विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक

Vaibhav Kolvankar Arrested : कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.

त्याच दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वैभव कोळवणकर यांच्यासोबत इतर दोन सहकाऱ्यांनाही देखील अटक करण्यात आली आहे.  तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी पोलीस दल सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसांनी पथसंचलन करत लॉंग मार्च काढला. सर्वेक्षण सुरळीत पार पडावं यासाठी बारसू परिसरात 2000 पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीसांना पाचारण करण्यात आले आहे.

रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेत तो बारसू, सोलगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply