Barsu Refinery Protest : बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित

Barsu Refinery Protest : बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या कालावधीमध्ये सरकारसोबत चर्चा होणार

बारसू रिफायनरी विरोधातलं आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी भू सर्वेक्षण केलं जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारच्या वेगवेगळ्या आश्वासनांनंतर देखील माती परिक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत.

मात्र आता आंदोलकांनी काही काळ आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशारा देण्यात आलेला आहे. आंदोलक काशिनाथ गोरले यांनी याबाबत माहिती दिली. आंदोलनकर्त्यामध्ये एकवाक्यता झाली असून पुढचे तीन दिवस आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. यादरम्यान चर्चा करुन तोडगा काढण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आज पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. यावेळी महिलांना मारहाण झाल्याचा दावा काही आंदोलकांनी केला आहे. पोलीसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न होत असताना देखील आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. भू-सर्वेक्षणाच्या जागेकडे निघालेल्या महिला आंदोलकांना पोलिसांकडून रोखण्यात आलं. मात्र यानंतर देखील आम्ही पुढे जाणारच अशी भूमिका शेतकरी महिलांनी घेतली. आता आंदोलन स्थगित केल्याची माहिती येत आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply