Baramati News : पुरंदर सिंचन योजनेच्या कार्यालयातच पेटविली चूल; पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Baramati News : पाणी प्रश्न भेळसावत असल्याने पुरंदर सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पुरंदर  सिंचन योजनेच्या कार्यालयातच महिलांनी स्वयंपाक करत हे आंदोलन केले असून पाणी मिळत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी  घेतली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून पुरंदर सिंचन योजनेचे पाणी न मिळाल्याने सासवड येथे पुरंदर सिंचन योजनेच्या कार्यालयातच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये महिलांनी टीका कार्यालयात चूल पेटवून स्वयंपाक  करण्यास सुरुवात केली आहे. गेली दीड महिन्यापासून या योजनेचे विद्युत पंपाचे दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र हे विद्युत पंप सुरू झाले, तरी पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेत आज थेट सिंचन योजना कार्यालयात दाखल झाले. 

Bhandara Crime News : वादातून शस्त्राने वार करत युवकाची हत्या; भंडारा शहरातील गजबजलेल्या परिसरातील घटना

तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार 

कार्यालयात मोठ्या संख्येने शेतकरी व महिला आंदोलनासाठी दाखल झाले. पुरंदर सिंचन योजनेचे पाणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका महिलांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply