Sunetra Pawar : मोठी बातमी! बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

Sunetra Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाने अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरु होत्या, त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, ''दोन उमेदवार यापूर्वी जाहीर केले आहेत. यातच बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने मीही अधिकृत घोषणा करतोय.''

Pune Crime : पुण्यात चाललंय तरी काय? भर दिवसा फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी

दरम्यान, बारामतीमध्ये यंदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा ही पवार कुटुंबियातील सदस्य जिंकत आले आहेत. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहेत. यातच यंदा येथून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे या येथून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोन्ही गटाकडून ही जागा जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली जात आहे.  

सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच शरद पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे.

यातच पुण्यातील मुळशी येथे सुनेत्रा पवार यांनी नागरीकांशी संवाद साधला आहे. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पिरंगुट, भुकुम भागात विविध सोसायट्यांना भेटी देत नागरीकांशी संवाद साधला. भुकुम येथील एका सोसायटीत संवाद कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या भाषणावेळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पाऊसधारा म्हणजे आपल्यावर झालेली कृपा आहे, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी पावसातही उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोसायट्यांमधील विविध प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अजित पवार यांच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply