Baramati Constituency : हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Baramati Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चार विधानसभा मतदार संघ संवेदनशील जाहीर करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे इ-मेलद्वारे केली होती.

Eknath Shinde : काँग्रेसकडून शहिदांचा अपमान; जनता वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा बदला घेईल; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

या संदर्भात मतदारसंघात कोणताही गैरप्रकार घडू नये. मतदारांना त्रास होणार नाही, यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply