Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Baramati Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 7 मे) मतदान घेण्यात येणार आहे. पुणे शहरातील १३ दुय्यम निबंधक कार्यालये सोमवारी (ता. 6 मे) व मंगळवारी (ता. 7 मे) असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मुद्रांक कार्यालयाने घेतला आहे.

सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार पुणे शहरातील सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या हवेली क्रमांक दोन, तीन, चार, पाच, आठ, नऊ, बारा, तेरा, सोळा, अठरा, वीस, एकवीस आणि चोवीस ही हे तेरा दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस बंद राहणार आहेत.

Pune News : रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

या कार्यालयांमधील दुय्यम निबंधकांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही 13 कार्यालये वगळता पुणे शहरातील अन्य सर्व दुय्यम निबंधक कार्यालये ही सुरु राहणार असल्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply