Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Baramati Assembly Election Result : बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीमध्ये पवार काका- पुतण्यांमध्ये तगडी फाइट सुरू आहे. सध्या मतमोजणी सुरू असून या मतदारसंघामध्ये अजित पवार आघाडीवर आहेत. अजित पवारांनी पुतण्या युगेंद्र पवारांना मागे टाकलं. या काका पुतण्यांना आव्हान देत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचकुले बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते या मतदारसंघात चर्चेत राहिले. पण अभिजीत बिचकुलेंना बारामतीकर पसंती देताना दिसत नाहीत. अभिजीत बिचकुले यांना सुरूवातीच्या कलामध्ये फक्त ९ मतं मिळली आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये झाली. या दोघांमध्ये तगडी फाईट झाली खरी पण आणखी एक उमेदवार चर्चेत राहिला तो म्हणजे अभिजीत बिचकुले. अभिजीत बिचकुले यांनी बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज भरून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. अभिजीत बिचकुलेंना बारामतीकरांनी चांगलंच नाकारले आहे. अभिजीत बिचकुले यांना दोन फेऱ्यांमध्ये फक्त ९ मतं मिळाली आहेत.

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

अभिजीत बिचकुले यांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले होते. बिचकुले फक्त ३ वेळा बारामतीमध्ये आले होते. एकदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, दुसऱ्यांदा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आणि तिसऱ्यांदा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी अजित पवार आणि युगेंद्र पवार यांना जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. अभिजीत बिचुकले कायम चर्चेत असतात. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यापासून ते जास्त चर्चेत आहेत.

अभिजीत बिचुकले यांनी याआधी मुंबईतील वरळी, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. अभिजीत बिचुकलेंनी २०१९ मध्ये वरळी विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढवली होती. त्यांनी कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक देखील लढवली होती. पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेविरोधात लढवली होती. अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढवल्या. पण ते विजयी झाले नाही. त्यांना एकाही निवडणुकीमध्ये यश आले नाही.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply