Bank Closed Today: आज बँकांचाही संप; SBI, HDFC ते PNB… कोणत्या बँका सुरु, कोणत्या बंद? वाचा यादी

image

आज बँका बंद असणार?

बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑफ इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाने संपाची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदाने सांगितले की, ते त्यांच्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी महत्त्वाची पाऊले उचलत आहेत. संप झाल्यास त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

स्टेट बँकेच्या म्हणण्यांनुसार, बँकेचे कामकाज तसेच सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परंतु सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. संपामुळे सेवांवर परिणाम होऊ शकतो.

आयडीबीआय बँकेलाही कामगार संघटनांकडून सूचना मिळाली आहे. बँकेने म्हटलंय की, संपादरम्यान, कामावर परिणाम होऊ शकतो. पंजाब नॅशनल बँकेचेही कर्मचारी सहभागी होऊ शकतात.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *