बांग्लादेशच्या 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीने (BNP) शानदार प्रदर्शन केलं. पूर्ण बहुमत मिळवून त्यांनी सत्तेत पुनरागमन केलय. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षावर अवामी लीगवर प्रतिबंध असल्याने ते निवडणुकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे BNP साठी निवडणूक सोपी झाली होती. कट्टरपंथी विचारधारा असलेल्या जमात-ए-इस्लामी पार्टी आघाडीकडून कडवी लढत मिळेल अशी अपेक्षा होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच्या कलांमध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीने आघाडी घेतली. शेवट पर्यंत ही आघाडी त्यांनी टिकवून ठेवली. या निवडणुकीत जमातच्या आघाडीला मोठा फटका बसला. आपण या निवडणुकीत मोठा उलटफेर घडवून आणू असं जमातला वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. जमातला 70 च्या आसपास जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाने या निवडणूक निकालांसंदर्भात अजून औपचारिक घोषणा केलेली नाही.
जमात-ए-इस्लामी मुख्य विरोधी पक्ष ठरला आहे. जमातचे प्रमुख नेते डॉक्टर शफीक़ुर रहमान यांना प्रमुख विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभवावी लागणार आहे. त्यांच्या आघाडीला 70 च्या आसापास जागा मिळतायत. जमातच्या नेतृत्वाखालील आघाडीला सध्या 68 जागा मिळाल्या आहेत. विद्यार्थी आंदोलनातून निर्माण झालेल्या नॅशनल सिटिजन पार्टीचा त्यांना 6 जागा मिळाल्याचा दावा आहे. हा निकाल पाकिस्तानसाठी सणसणीत चपराक आहे. बांग्लादेशच्या जनतेने जो कौल दिला त्यातून सर्वकाही स्पष्ट आहे. त्यांनी कट्टरपंथी विचारधारेला सत्तापद नाकारलय. पाकिस्तानचं जमात-ए-इस्लामी सारख्या पक्षांना समर्थन आहे. कारण बांग्लादेशला कट्टरतावादाकडे नेऊन आपली पोळी भाजण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.
ही भारताच्या दृष्टीने चांगली बाब
बांग्लादेशात सध्या मोठ्या प्रमाणात हिंदू विरोध सुरु आहे. हिंदुंच्या तिथे हत्या सुरु आहेत. पाकिस्तानला असेच कट्टरपंथी विचारधारेचे पक्ष तिथे सत्तेवर हवे होते. पण बांग्लादेशच्या जनतेने निकालातून स्पष्टपणे आपला विचार मांडला आहे. BNP सोबत भारतातल्या राजकीय पक्षांचं फार सख्य नाहीय. पण ते जमात इतके कट्टरपंथी नाहीत. ही भारताच्या दृष्टीने चांगली बाब आहे.
बांग्लादेशी संसदेत एकूण किती जागा?
बांग्लादेशच्या संसदेत एकूण 300 जागा आहेत. त्यातल्या 278 जागांचे निकाल लागले आहेत. बीएनपीच्या नेतृत्वाखालील आघाडीला 203 जागा मिळाल्या आहेत. जमातच्या आघाडीला 68 जागा आणि इस्लामी आंदोलन बांग्लादेशला 1 जागा आणि अन्य पक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत. अजून 21 जागांचे निकाल येणं बाकी आहे. बांग्लादेशात निवडणुकीआधी जमात-ए-इस्लामीने देशभरात आपल्याबाजूने माहौल बनवला होता. पण निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. कधी जमात-ए-इस्लामी बीएनपीचा जवळचा मित्र पक्ष होता.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

