IPL 2024 KL Rahul : लखनौला राहुलच्या तंदुरुस्तीची चिंता ; यजमान बंगळूरला सांघिक कामगिरी सुधारण्याची गरज

Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व लखनौ सुपरजायंटस्‌ यांच्यामध्ये उद्या (ता. २) एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएलची साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आला असल्यामुळे दुसऱ्या विजयासाठी उभय संघ प्रयत्न करतील यात शंका नाही. के. एल. राहुलच्या तंदुरुस्तीची चिंता लखनौला सतावत असून बंगळूरचा संघ सांघिक कामगिरीत सुधारणा करण्यासाठी जीवाचे रान करताना दिसेल.

बंगळूरकडून विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला ठसा उमटवता आलेला नाही. विराटने तीन डावांमधून १८१ धावा फटकावल्या आहेत. कर्णधार फाफ ड्युप्लेसी (४६ धावा), ग्लेन मॅक्सवेल (३१ धावा) व कॅमेरुन ग्रीन (५४ धावा) या स्टार फलंदाजांसह रजत पाटीदार (२१ धावा) यालाही अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे दिनेश कार्तिक, अनुज रावत व महिपाल लोमरोर या तळाच्या फलंदाजांवर बंगळूरला अवलंबून रहावे लागत आहे. रजत पाटीदारऐवजी सुयश प्रभूदेसाई याला बंगळूरच्या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

IPL 2024 MI Vs RR : रोहित शर्मा बाद होताच सर्वत्र पसरला सन्नाटा

राहुल इम्पॅक्ट प्लेयर राहणार का?

लखनौने पंजाबवर २१ धावांनी विजय मिळवला. या विजयात के. एल. राहुल इम्पॅक्ट खेळाडू म्हणून सहभागी झाला. आगामी टी-२० विश्‍वकरंडकाचा विचार करता त्याला पुढे दुखापत होऊ नये, यासाठी लखनौ संघातून त्याची इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या त्याच्या तंदुरुस्तीवर गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. कर्णधार, फलंदाज व यष्टिरक्षक अशा तिहेरी भूमिकेत तो दिसेल का, या प्रश्‍नाचे उत्तर लवकरच मिळेल.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply