Bandh Disrupts ST Bus Services : लातूरहून जाणा-या बस रद्द, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणीसाठीची सेवा बंद

Bandh Disrupts ST Bus Services : मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाचा आज (शुक्रवार) 7 वा दिवस आहे. जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातून बाहेरगावी जाणा-या एसटीच्या बस अचानक रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने लातूर जिल्ह्यातून बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी या मार्गावर जाणा-या बस आज सकाळी अचानक रद्द केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने बसचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र हाल हाेता पाहयाला मिळत आहे.

Hingoli Politics : हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्ह्यातील बडा नेते 'वंचित'मध्ये प्रवेश करणार

बसच्या काचांना जाळी हवी : चालक-वाहकांची मागणी

बीड येथे मराठा आंदोलनाला काहीसे हिंसक वळण लागल्याचे चित्र असतानाच आता बीडमध्ये सुरक्षेच्या प्रश्नावरून एसटी बस चालक वाहक आक्रमक झाले आहेत. आंदोलकाकडून एसटी बस टार्गेट केल्या जात असल्यामुळे आमच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला असे चालक वाहकांचे म्हणणे आहे.

बसवर दगडफेक झाल्याने आमचा एसटी बस चालक जखमी झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारने एसटी बसच्या दर्शनी भागातील काचेवर जाळ्या बसवाव्यात. जोपर्यंत जाळ्या बसवणार नाहीत, तोपर्यंत एकही बस आम्ही काढणार नाही असा निर्धार बीड मधील एसटी बस चालक आणि वाहकांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply