Balasaheb Thorat : कुणीही दावा केला तरी पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार, अजित पवारांना बाळासाहेब थोरातांचं उत्तर

Pune : पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाला आहे. अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केल्यानंतर आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. कोणीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

पारंपरिक मतदारसंघ कुणाचा हे महत्त्वाचं

आमची मविआ आहे, यात ताकद जास्त कोणाची यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोण निवडणूक लढत आलं हे महत्त्वाचं आहे. चर्चा होत असते आम्ही बैठकीत निर्णय घेऊ. आता कसबा विधानसभा आम्ही लढलो सर्वांचं सहकार्य झालंच, हे आम्ही नाकारत नाही. तसंच ही लोकसभा आम्ही लढवू आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. अशीच विनंती आमची राहील, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. 

पुणे लोकसभा राष्ट्रवादीच लढवेल या अजित पवार यांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, अगदी बैठकीतही हा मुद्दा येईल. मात्र पारंपरिक पद्धतीने जो लढत आलाय, त्यानेच तो लढवावा आणि त्यावर आम्ही ठाम राहू. आताही 48 लोकसभेबाबत तीच चर्चा आहे. पारंपरिक पद्धतीनेच लढली जाईल. 

पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आले आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीच्या जागावाटपाचा निमित्ताने झालेल्या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे जाहीर झाले आहे. तरीही पुण्याच्या जागेवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा दावा केल्याने काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply