Badlapur Case : बदलापुरात हळहळ! लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव, मृत्यूनंतर बैलानंही सोडले प्राण

Badlapur Case : पाळीव प्राणी नेहमी आपल्याला लळा लावतात. पण बदलापुरात लाडक्या बैलानंच मालकाचा जीव घेतला आहे. हा धक्कादायक प्रकार बदलापुरच्या वालिवली या गावात घडला. एका लाडक्या बैलानंच मालकाचा जीव घेतला असून त्यानंतर काही वेळातच बैलाचाही मृत्यू झाला आहे. विजय म्हात्रे असं बैल मालकाचे नाव आहे. बैलगाडा शर्यतीची आवड असल्यामुळं त्यांनी शर्यतीचा बैल विकत घेतला होता. या घटनेनंतर बदलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

अनेकजण गोठ्यातल्या बैलावर जीवापाड प्रेम करतात. मात्र अशाच एका लाडक्या बैलानं आपल्या मालकाचाच जीव घेतला आहे. बैल मालक विजय म्हात्रे हे बदलापुरच्या वालिवली गावातील खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते कराटेपटू देखील होते. त्यांना बैल शर्यतीची आवड होती. त्यामुळे विजय यांनी तीन वर्षांपूर्वीच बैल खरेदी केला होता.

Accident : कर्नाटकमध्ये भीषण अपघात, सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

विजय यांनी बैलाची पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी याच बैलानं मालकाचा जीव घेतला. उल्हासनदी किनारी बैलाला घेऊन जात असताना बैलाच्या दोरीत त्यांचा पाय अडकला. त्यानंतर बैलानं विजयवर हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की त्यात विजय यांचा जागीच मृत्यू झाला.

बैलाला काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला होता. अशी माहिती समोर येत आहे. विजय यांच्यावर हल्ला केल्यानंतर काही तासातच बैलाचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर बदलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

जर आपणही प्राणी पाळत असाल तर, जितकी त्याची काळजी घ्याल तितकीच स्वत:च्या जिवाची देखील घ्या.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply