Badlapur Accident : बदलापूरात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची डंपरला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

Badlapur Accident News : बदलापूर शहरात एक भीषण अपघात घडला आहे. एका रिक्षाचालकाच्या चुकीमुळे मोठा अपघात झाला. रिक्षाचालकाने पलिकडे जाण्यासाठी रिक्षा वळवली त्याच रस्त्यावरुन मागून एक डंपर येत होता. रिक्षाला वाचवण्यासाठी डंपरने ब्रेक मारला पण पाठीमागून येणाऱ्या ट्रकने डंपरने जोरदार धडक मारली. यात ट्रकचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील कात्रप परिसरात हा अपघात दुपारच्या सुमारास घडला. कात्रप परिसरातील कल्याण - कर्जत महामार्गावर रिक्षाचालकाच्या चुकीमुळे ट्रकने डंपरला पाठीमागून धडक दिली. दरम्यान ही अपघाताची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

Mumbai Crime : एकटी असल्याचे पाहून घरात घुसला, हात-पाय बांधून हत्या; वृद्ध महिलेच्या हत्येने मुंबई हादरली

दुपारच्या सुमारास कल्याण-कर्जत महामार्गावरुन ट्रक आणि डंपर कर्जतच्या दिशेने निघाला होता. एका रिक्षाचालकाने अचानक रस्ता बदलून पलिकडे जाण्यासाठी अचानक रिक्षा वळवली आणि डंपरच्या समोर नेली. रिक्षाला वाचवण्यासाठी डंपरने जोरात ब्रेक दाबला. पण यात डंपरच्या पाठीमागून आलेल्या ट्रकने डंपरला जोरदार धडक मारली.

एका चुकीमुळे हा भीषण अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. पण त्या ट्रकचे खूप नुकसान झाले. ट्रकचा पुढचा भाग खराब झाला. समोरच्या काचांचा चुराडा झाला. बाजूचे दरवाजे देखील खराब झाले. सुदैवाने ट्रकचालकाला अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply