Badlapur: बदलापूर स्थानकात भयंकर अपघात! धावत्या लोकलमधून महिला पडली; डोक्याला गंभीर इजा

Badlapur : बदलापूर स्टेशनजवळ लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कर्जतहून सीसीएसएमटीला जाणारी लोकल बदलापूर स्थानकात आली होती.

दरम्यान प्रचंड गर्दी असल्यामुळे धावत्या लोकलमधून ती खाली पडली. महिलेच्या डोक्याला जबर मार लागला असून, रेल्वे पोलिसांनी महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

बदलापूर स्थानकाजवळ एक भयंकर अपघाताची घटना घडली आहे. एक महिला धावत्या ट्रेनमधून खाली पडली आहे. कर्जतहून सीसीएसएमटीकडे जाणारी लोकल बदलापूरला आली होती. ही लोकल ८ वाजून ५९ मिनिटांनी बदलापूर स्थानकावर पोहोचली. कर्जतहून आल्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती.

Sangli Crime : धावत्या शिवशाहीमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, सांगली स्थानकात उतरताच रडू लागली,

पोलिसांची नजर पडली अन्...

यात ती महिला चढली, गर्दी अल्यामुळे ती दाराजवळच उभी होती. मात्र, लोकल सुटल्यानंतर महिला धावत्या लोकलमधून खाली पडली आहे. कल्पना जेडिया असं महिलेचं नाव आहे. या महिलेच्या डोक्यात जबर मार लागला असून, रेल्वे पोलिसांनी तातडीनं त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल अर्धा तास एकही लोकल उपलब्ध नव्हती. त्यामुळेच ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. मात्र ,ही लोकल कर्जतवरून सुटल्यामुळे आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. त्यामुळे बदलापूरकरांना दारात लटकून प्रवास करावा लागला होता.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply