Bachchu Kadu : 'सचिन तेंडुलकरच्या गेमिंग जाहिरातीमुळेच बॉडीगार्डचा मृत्यू', बच्चू कडू पुन्हा आक्रमक; घरासमोर आंदोलनाचा इशारा

Bachchu Kadu : माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्याविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच माजीक्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली होती. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. याच प्रकरणावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Maharashtra HSC Result 2024 : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी; ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

" जो अंगरक्षक सचिन तेंडुलकर यांचे रक्षण करत होता. त्यांना इजा होऊ नये म्हणून काम करत होता. त्यालाच सचिन करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला. हे दुर्दैवी आहे, सचिन तेंडुलकरने याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

तसेच सचिनने भारतरत्न परत करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीविरोधात याआधीही आक्रमक पवित्रा घेतला होता. गेल्यावर्षी त्यांनी सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले होते. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी सचिनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply