Bachchu Kadu : मराठा पाकिस्तानचा की अमेरिकेचा? आरक्षणावरून बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

Bachchu Kadu : मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे  यांची आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी भेट घेतली आहे. दरम्यान, त्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मराठा समाजातील लोकं पाकिस्तान आणि अमेरिकेचे आहे काय? , त्यांना आरक्षण का मिळत नाही असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असेपर्यंत बच्चू कडू सुद्धा आंतरवाली सराटी गावात थांबणार आहे. 

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य रक्तदान शिबीर घेतलं. तसेच, स्वतः रक्तदान केलं. यावेळी, त्यांनी बोलतांना मराठा आरक्षणावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "निवडक मराठ्यांसाठी आपण वाळीत टाकण्या सारख करीत आहे. तसाही ओबीसीला भेटलेला आरक्षण कमीच आहे. हे 52, 55 टक्के आरक्षण जातो. त्यामुळे, ओबीसींचा आरक्षण वाढून घ्या किंवा अ, ब, क, ड करावे. पण, साफ नाही म्हटल्याने चुकीचं संदेश जातो. तसेच, मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे?, पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे का?, याचा आरक्षणावर अधिकार का नाही?, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. 

 

 

 

Maratha Reservation : संभाजीनगरच्या आठही आगारात बस जागेवरच उभ्या; महामंडळाला दिड कोटीचा तोटा

 

संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर 

आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन संवाद साधला आहे. तसेच यापुढे देखील सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply