Bacchu Kadu : आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? राणांचा उल्लेख टाळत बच्चू कडूंनी पुन्हा भाजपला डिवचलं

Bacchu Kadu : आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आलात असा टाेला आमदार बच्चू कडू  यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार नवनीत राणा यांना लगावला आहे. आमदार बच्चू कडू हे अचलपूर मतदार संघातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बाेलत हाेते.

आमदार बच्चू कडू म्हणाले आजपर्यत या मतदारसंघात कोणी एवढा निधी आणला का ? काही लोक म्हणतात आम्ही निधी आणला. आमचीच सरकार आहे. भाजपवाले तर बाहेर बसले होते. आम्ही भाजपवाल्यांना सत्तेत आणलं. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले.

Nanded Accident News : रुग्णवाहिकेचा फुटला टायर; घडला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, चाैघे गंभीर जखमी

बच्चू कडू पुढे बाेलताना म्हणाले दीड वर्षात सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघाचा कायापालट करीत आहाेत. गावात देखील विविध याेजना आणल्या. त्यामुळे नागरिकांचा फायदा हाेत आहे. काहींनी अद्याप याेजनांचा फायदा घेतला नाही. त्यांनी याेग्य कागपदत्रं काढून याेजनांचा फायदा घ्यावा. सरकार तर वरती आणि खालती आहे भाऊ! भगव्या वाल्याचे आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करायला लागते असेही आमदार कडू यांनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply