Mumbai : घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावे, महायुती सरकारवर शरद पवार संतापले

Mumbai : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. यातच शरद पवार यांनी म्हटलं आहे की, घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावे. एक्सवर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले आहेत की, ''राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.''

CM Eknath Shinde : बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

ते म्हणाले की, ''याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.''

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ…

याच घाटेंवर आपली प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ''राज्य शासनाची वाय दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. बाबा सिद्दिकी यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केले आहे.''

ते म्हणाले, ''राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे, असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे याची चौकशी झाली पाहिजे.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply