Ayodhya Ram Mandir Threat Call : अयोध्येतील राम मंदिर बाॅम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Ayodhya Ram Mandir Threat Call : अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

Mumbai News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईला वेग; IB अन् ATS ची कारवाई!

अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराला धमकी दिल्यानंतर उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या १४ वर्षीय मुलाला बरेली येथून ताब्यात घेतलं आहे. हा मुलगा इयत्त आठवीत आहे.

याने ११२ कंट्रोल रुमला फोन करून अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. चौकशी दरम्यान या मुलाने युट्यूबवर राम मंदिर होत असल्याचं पाहिलं, त्यानंतर त्याने ही धमकी दिल्याचे सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply