Ayodhya Ram Mandir : महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दाखविला जाणार राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा उदय सामंत

Ayodhya Ram Mandir : मी आवाहन केल्यानंतर आज राज्यातील सर्व चित्रपटगृहात राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. ज्यांना अयोध्येत जाता येत नाही त्यांनी हा सोहळा मोठ्या पडद्यावर पाहावे असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील जनतेस केले आहे.

अयोध्या प्राणप्रतिष्ठेचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा आंनदोत्सव पहायला मिळतोय. जिल्ह्यातील १९६ राम मंदिर तर ४६६३ ग्राममंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलय. रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर गुढी उभारल्या गेल्यात.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त अवघ्या ८४ सेकंदांचा, वाचा कसा असेल कार्यक्रम?

रत्नागिरी शहरात रामाचे कट आउट पोस्टर लावण्यात आलेत. रत्नागिरी शहरातील वातावरण देखील भगवामय झाले आहे. सर्वच रस्त्यांवरती भगवे रामाचे झेंडे लावण्यात आले आहेत. रत्नागिरीतील राम मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळतेय.

मंत्री उदय सामंत म्हणाले पूर्ण विश्व सध्या राममय झाले आहे. त्याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं. शालेय जीवनापासून मी राम मंदिर पूर्ण होण्याचा स्वप्न बघतोय. राम मंदिर म्हणून हा सर्वांचा स्वाभिमान आहे.

मी आवाहन केल्यानंतर आज राज्यातील सर्व चित्रपटगृहात राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. ज्यांना अयोध्येत जाता येत नाही त्यांनी हा सोहळा मोठ्या पडद्यावर पाहावे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply