Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या लोकार्पणाआधीच उत्तर प्रदेशात ISIS च्या दहशतवाद्याला अटक, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाआधीच खळबळजनक वृत्त हाती आलं आहे. दहशतवादी संघटना ISIS च्या एका दहशतवाद्याला एटीएसने अलिगडमधून अटक केली आहे. ISIS च्या अलिगड मॉड्यूलच्या आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाआधीच दहशतवादी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने दहशतवादी फैजान बख्तियार अटक केली. फैजानने प्रयागराजच्या रिजवान अशरफच्या माध्यमातून ISIS मध्ये प्रवेश केला होता. फैजानच्या काही साथीदारांनी अलीगडसाठी ISIS मॉड्यूल तयार केला होता.

Talathi Bharti Exam : तलाठी भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

या मॉड्यूलच्या माध्यमातून त्यांची मोठ्या घातपाताची तयारी सुरु होती. तर दहशतवादी फैजान बख्तियार अलीगड मुस्लिम विद्यापीठातून 'मास्टर इन सोशल वर्क'च्या पदवीचं शिक्षण घेत होता.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply